Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- सर्व पक्ष कार्यकर्त्यांची मागणी

Responsive Ad Here



जामनेर 

येथील तहसील कचेरीवर सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाजिक संघटना व बहुजनवादी संघटना यांच्यातर्फे संभाजी भिडे यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन सादर केले

या निवेदनात गेल्या काही महिन्यापासून मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात नियोजन पूर्ण शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून सभा आयोजित करण्यात येत आहे या सभेच्या माध्यमातून वर बसलेल्या भारतीय बहुजन समाजातील तरुणांना चुकीचे मार्गदर्शन करून देशाला दिशा दाखवणारे संत महात्मे महापुरुष तसेच स्वातंत्र्यसैनिक राष्ट्रपिता महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले देशाचे प्रथम पंतप्रधान स्वर्गीय पंडित नेहरू तसेच भारतीय राष्ट्रगीत राष्ट्रध्वज स्वातंत्र्य दिन या संदर्भात आक्षेपार्ह विधान करून तरुणाची डोकी भडकवण्याचे काम संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हे करीत आहे तरी मनोहर कुलकर्णी यांचे वक्तव्य पाहता समाजातील निर्माण करून ते महाराष्ट्रातील वातावरण खराब करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहे या नियोजन कटामागे कुठल्याही देशद्रोही संघटना असण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे

प्रसंगी जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना हे निवेदन सादर करण्यात आलं जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे याप्रसंगी उपस्थित होते या मोर्चात डॉक्टर प्रशांत पाटील राजीव खरे संतोष झाल्टे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षविलास राजपूत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माधव चव्हाण दत्ता साबळे सागर कुमावत रुपेश पाटील राहुल इंगळे अण्णा तायडे किशोर झाल्टे विकास पाटील प्रदीप गायके दत्ता नेरकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते