Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नामवंत व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड; लोणार येथील रौनकअली यांचे निधन

Responsive Ad Here


असलम परवेज : लोणार तालुका प्रतिनिधी

        लोणार येथील समाजकारण व राजकारणातील प्रसिद्ध नेते   रौनकअली महेमूदअली सिद्दिकी यांचे २२ ऑगस्ट २०२३  रोजी सकाळी ७  वाजेच्या दरम्यान हृदयविकाराने आकास्मिक पणे वयाचे ५८  वर्षात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शहरभरात एकच खडबड उडाली आहे. 

         रौनकअली यांचा जन्म 11 सप्टेंबर 1965 रोजी लोणार येथे झाला होता. ते हिंदू मुस्लिम सर्वांना सोबत घेऊन चालणारे मन मिळाऊ  व्यक्तिमत्व होते. त्यांची दफन विधी २२ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ८:३० वाजता लोणार येथे संपन्न झाली अनेक समाज बांधवांनी त्यांच्या दुःखामध्ये सामील होण्याकरिता आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.

        रौनकअली आपली मते स्पष्टपणे व निर्भिडपणे मांडत होते. स्वभावाने जिद्दी पण मनाने प्रेमळ असे एक दबंग व्यक्तिमत्व म्हणून लोणारच्या राजकारणात व समाजकारणात त्यांची विशेष ओळख होती. लोणार शहर, तालुका व बुलढाणा जिल्ह्य़ातील प्रमुख मान्यवरांनी रौनक अली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखामध्ये सामील झाले.

          रौनक अली यांच्या पश्चात  पत्नी, १ मुली, २ मुलं व सून आणि ३ नातवंड असा आप्त परिवार आहे.