असलम परवेज: लोणार
लोणार येथील प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक आबेद खान आणि ज्योत्स्ना गुलाब सरदार यांनी 4 सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे प्रभाग क्रमांक पाच मधील स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत दलित वस्तीत सन 2019-20 मधील मागासवर्गीय लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयचा तिसरा हप्ता तात्काळ प्रदान न केल्यास कार्यालयासमोर उपोषणाचा मुख्याधिकारी नगरपरिषद लोणार यांना इशारा दिला आहे .
तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा, उपविभागीय अधिकारी महसूल मेहकर, लोणार तहसीलदार, ठाणेदार पोलीस स्टेशन लोणार, व तालुका पत्रकार संघ लोणार यांना सुद्धा याबाबत कळविले आहे. यावर आता मुख्याधिकारी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
