असलम परवेज:तालुका प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार तीन सप्टेंबर 2023 रोजी लोणार तालुका बंदची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने रविवारी सकाळपासूनच शंभर टक्के सर्व बंद होती, व मार्केट लाईन, सोनार लाईन, भाजी मंडी, बस स्टॅन्ड, हिरडव चौक, एसबीआय रोड, जामा मस्जिद चौक, साबुणपुरा, तसेच शहरातील इतर सर्व भागातील दुकाने शंभर टक्के बंद पाहायला मिळाली. यामुळे हे बंद यशस्वी ठरल्याचे चित्र आहे.
सर्व जाती व धर्माच्या लोकांनी मराठा समाज बांधवांना सर्वतोपरी सहकार्य केले.तालुक्यातील विविध गावांमध्ये सुद्धा हे बंद पहायला मिळाला. त्यामुळे लोणार तालुका बंद यशस्वी ठरले. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त केले होते पण शहरात सर्वत्र शांतता पाहायला मिळाली हे विशेष.
