जळगाव प्रतिनिधी( गणेश पांढरे)
जळगाव शहरातील प्रिपळा येथे छत्रपती शिवाजी महाराज तसेच सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्देश साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनानंतर ठाकरेंची जाहीर सभा झाली. या सभेतून ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारसह पंतप्रधान मोदींवरही घणाघात केला.
काय म्हणाले ठाकरे?
"स्वातंत्र्यलढ्यात काहीही योगदान नसलेली लोक फक्त नेते चोरुन मिरवण्याचे काम सध्या करत आहेत. तिकडे वल्लभभाई, सुभाष बाबू आणि आता माझे वडील चोरायला निघालेत," असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. "वल्लभभाई पटेलांचा हजारो कोटींचा पुतळा बांधला पण त्यांच्या कामगिरीच्या जवळही ते फिरकू शकत नाहीत," असेही ते यावेळी म्हणाले.
भाजपमध्ये सगळे उपरे...
सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका केली. " कधीकाळी युतीचे वैभवशाली दिवस होते. नाथाभाऊ, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांसारखे नेते एकत्र दिसायचे, मात्र सध्या भाजपमध्ये सगळे उपरे आहेत फडणवीसांनी निष्ठावान नेते संपवले आणि उपरे उरावर बसवले," असा आरोप त्यांनी केला.
जालना कांड...
दरम्यान, जालन्यातील आंदोलन कर्त्यांवर झालेल्या लाठीचारावरुन उद्धव ठाकरेंवर राज्य सरकारवर टीका केली. "शांततेनं उपोषण करत होते. असे काय चुकले की त्यांना दणादण मारत सुटले, जालियानबाला हत्याकांड झाले तसेच हे जालना कांड... असा घणाघात त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे, मात्र जरांगे पाटील उपोषणाला बसलेत त्यांच्याकडे जायला वेळ नाही, असा टोलाही एकनाथ शिंदेंना लगावला
व्यासपीठावर खासदार संजय राऊत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जिल्हाप्रमुख समाधान महाजन डॉक्टर हर्षल माने दीपक सिंग राजपूत जळगावचे महापौर जयश्री ताई महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
