Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सदाशिव सस्थान येथे भव्य महादेव मंदिर बांधकामाचा संकल्प सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन

Responsive Ad Here



                                                लोकवर्गणीतून होणार मंदिराचे बांधकाम

हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारिया 

 हिवरखेड :-  येथील अत्यंत पुरातन व ऐतिहासिक वारसा असलेले सदाशिव संस्थान हे नागरिकांचे श्रद्धा स्थान असून येथील जुने महादेवाचे ( भोलेनाथ ) मंदिर क्षितिग्रस्त झाल्यामुळे शिवभक्त व हिवरखेड वासीयांनि लोकवर्गणीतून  महादेवाचे भव्य मंदिर बांधकामाचा संकल्प केला असून या मंदिर बांधकामाचे विधिवत पूजन करून 11 जोडप्यांच्या साक्षीने मंदिर बांधकामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे.

येथील सदाशिव संस्थान हे पुरातन देवस्थान असून येथे जुने व प्रचंड मोठे वडाचे झाड होते व याच झाडाखाली महादेवाचे लहान मंदिर स्थापित होते मात्र कालांतराने सदर मंदिर हे क्षतीग्रस्त झाल्यामुळे महादेवाच्या नावाने ओळखले जाणारे सदाशिव संस्थान येथे महादेवाचे भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प शिवभक्त व हिवरखेड वासीयांनि केला असून या अनुषंगाने एक सभा घेण्यात येऊन प्रत्यक्ष मंदिर बांधकामाचे विधिवत पूजन करून भूमिपूजन करण्यात आले आहे.प्रस्तावित मंदिर बांधकाम ठिकाणी अकोट मतदार संघातचे आमदार प्रकाश भरसाकळे यांनी भेट देऊन शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी हिवरखेड वासी व आजू बाजूच्या परिसरातील नागरिकांनी सुद्धा सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन सदाशिव संस्थान मंदिर बांधकाम समितीच्या वतीने करण्यात आले आहे.