"सलग १०व्या वर्षीही यशस्वी रक्तदानाची परंपरा कायमच"
असलम परवेज:लोणार
दि.२८/०९/२०२३
|लोणार| "मानवामध्ये सर्वोत्तम मनुष्य तो आहे, जो अल्लाहच्या निर्मितीसाठी फायदेशीर आहे" - प्रेषित मोहम्मद पैगंबर
प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या आपल्या अनुयायींना अशाच शिकवणीमुळे त्यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून भारतातच नव्हे तर जगभरामध्ये मनुष्य जातीच्या कल्यानासाठी विविध उपक्रम राबविल्या जातात. याचाच एक भाग म्हणून हा रक्तदान शिबिर लोणार येथी मागील सलग १० वर्षापासून यशस्वीपणे राबविला जात आहे. यामध्ये हिंदू-मुस्लिम तसेच सर्व जाती धर्माचे लोक आपले रक्तदान करून हा कार्यक्रम १००% टक्के यशस्वी करतात हे विशेष.
ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने लोणार येथे सलग १०व्या वर्षीही जमिअते उलमाए हिंदच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे गुरुवार दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते.
हा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश भाऊ मापारी, डॉक्टर के.बी मापारी, प्रा.बळीराम मापारी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, लोणार पोलीस निरिक्षक निमिश मेहेत्रे व पोलीस उपनिरीक्षक, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
हा रक्तदान शिबिर औरंगाबाद ब्लड बँक च्या सहयोगाने आयोजित केला गेला, यामध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ११६ रक्तदातांनी आपले रक्तदान करून या रक्तदानाला यशस्वी केले होते. अशी माहिती जमियते उलमा लोणारचे जनरल सेक्रेटरी ॲड.हाजी रिजवान जड्डा यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी नगरसेवक आबेद खान, इमरान खान, गटनेते भूषण मापारी, नितीन शिंदे,न.सेवक गुलाब सरदार, रिजवान खान करामत खान, हाजी महेमूद सेठ, हाजी मसूद सेठ, हाजी गफार सेठ, नासेर जड्डा सेठ, हाजी अफसर खान, सह इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जमियतचे कार्यकर्ते वसीफ खान, मोहम्मद राज़ीक, जमियतचे शहर अध्यक्ष मौलाना शेख आयाज, हाफिज़ तारीक, शेख इक्बाल, वसीम सर, अल्ताफ सर, मोहम्मद खान, जफर खान, प्राचार्य तोफिक सर, अमजद टेलर, दादू भाई, निसार शेख सर, मोहम्मद तारीक मोहम्मद ज़फी व इतर मंडळीनी परिश्रम घेतले.
