Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

फुलांत न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले...

Responsive Ad Here


                                'आठवणींतील महानोर' या कार्यक्रमाने रसिक भावले_

जामनेर 

या नभाने या भुईला दान द्यावे, मीच माझा एककल्ली एकटा चालीत गेलो, पाण्यात लगटले पाय, फुलात न्हाली पहाट ओली यांसारख्या अजरामय कवितांनी जामनेरकर भारवले.निमित्त होतं आनंदयात्री परिवार निर्मित 'आठवणींतील महानोर' या कार्यक्रमाचं.रानकवी स्व ना धों महानोर यांना आदरांजली वाहणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब व आनंदयात्री परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी अभियंता जे. के चव्हाण, परिवर्तनचे रंगकर्मी शंभू पाटील, अभिनेते हर्षल पाटील, सोनाली पाटील उपस्थित होते.सुरुवातीला जात्यावरची ओवी सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.'मी रात टाकली', आम्ही ठाकरं ठाकरं, गोर्या देहावरची कांती,भरलं आभाळ, घन ओथंबूनी येती..यांसारख्या गीतांनी कार्यक्रमलक्षवेधी ठरला.कार्यक्रमात डॉ प्रज्ञा साठे, डॉ पल्लवी सोनवणे, कांचन महाजन, सुधीर साठे, डॉ राजेश सोनवणे,प्रा नितीन पाटील यांनी कविता वाचन केले तर ख़ुशी पांडे, मानसी शेळके, डॉ भाग्यश्री चौधरी, डॉ अमोल सेठ, डॉ चंद्रशेखर पाटील, डॉ गिरीश पाटील यांनी गायन केले.कार्यक्रमाचे निवेदन गणेश राऊत यांनी केले. तर वाद्यसहाय्य आदित्य पाटील व अमेय महाजन यांनी केले.या कार्यक्रमाची संकल्पना डॉ आशिष महाजन, दिग्दर्शन कडू माळी, सुधीर साठे, रंगमंच नेपथ्य व प्रकाशयोजना सुहास चौधरी, संगीत निर्देशन रौफ शेख, संगीत संयोजन सुरसंगम ऑर्केस्ट्रा, तंत्र सहाय्य अमरीश चौधरी, डॉ पराग पाटील, डॉ निलेश पाटील, बंडू जोशी, संकेत पमणानी यांचे लाभले.कार्यक्रमात लोकसंस्कृती सादरीकरात रेणुका चौधरी, डॉ सीमा पाटील, शिल्पा पाटील, वृंदा जोशी यांनी सहभाग घेतला.रंगकर्मी शंभु पाटील व जे के चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सुहास चौधरी यांनी केले.