Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार येथे भारनियमन मध्ये भेदभाव

Responsive Ad Here


वाढत्या तापमानात भारनियमनाचा झटका फक्त ठराविक भागातील लोकांनाच "तोफिक कुरेशी यांची लोणार महावितरण विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार"

लोणार: असलम परवेज

लोणार:       गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान वाढत असून त्यात आर्द्रता वाढल्याने उन्हाच्या झळा बसत आहेत. याच दरम्यान महावितरण कडून लोणार येथील काही ठराविक भागातच विजेचा पुरवठा खंडीत केला जात आहे पण काही भागात विजेचा पुरवठा सुरळीत सुरू  आहे. यामुळे भार नियमनाचे चटके फक्त ठराविक भागातील लोकांनाच बसत आहे. या आशाची लेखी तक्रार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्यांक  तालुका अध्यक्ष मोहम्मद तौफीक कुरेशी यांनी दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी लोणार पोलीस स्टेशनला केली आहे.

            दिलेल्या तक्रारी नुसार शहरात काही भागात विद्युत पुरवठा सुरळीत सुरू असून दुसरीकडे जामा मस्जिद परिसर, जैन मंदिर परिसर, तसेच पोलीस स्टेशन समोरील परिसरामध्ये तासनतास विद्युत पुरवठा खंडित करून लोणार महावितरण कंपनीकडून जबरदस्त भेदभाव करण्यात येत आहे.या भेदभावाबद्दल विचारना करण्याकरिता तोफिक कुरेशी लोणार महावितरणच्या कार्यालात गेले असता, वरिष्ठांचे आदेशान्वये वीज पुरवठा बंद करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी कळविले. याबाबत लेखी देण्याचे  सांगितल्यावर ते देण्यास नकार दिला. तसेच सहाय्यक अभियंता यांना फोन द्वारे संपर्क केला असता त्यांचे फोन बंद होते.

        तरी तौफीक कुरेशी यांनी पोलीस स्टेशन गाठून लोणार महावितरण द्वारे शहरात भेदभाव निर्माण करण्यात येत असून ते शहरात शांतता भंग करण्याचे कारस्थान ठरत आहे. जर शहरात काही अनुचित प्रकार घडला तर याला महावितरण लोणार जबाबदार राहील, अशी लेखी तक्रार दिली आहे.