Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दखल उत्तम कामगिरीची; मोहम्मद हुसेन यांची राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कारासाठी निवड

Responsive Ad Here

    



                "गालिब अकॅडमी, नवी दिल्ली येथे होणार सन्मान व पुरस्कार वितरण"

असलम परवेज    

भारतीय राष्ट्रीय उर्दू शिक्षक कर्मचारी संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आबिद खान यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार २०२३ जाहीर केला आहे. तिसरे राष्ट्रीय परिषदच्या निमित्ताने राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार अशा शिक्षकांना प्रदान करण्यात येणार आहे ज्यांनी या नवीन पिढीला शिक्षण देऊन त्यांना उच्च पदापर्यंत  पोहोचविण्याचे काम केले, तसेच शासकीय योजना व उपक्रमातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.या सन्मानासाठी देशातील २० पेक्षा अधिक राज्यातील शिक्षकांची निवड करण्यात आली असून या मध्ये  जि.प वरिष्ठ प्राथमिक शाळा,दही हांडा जिल्हा अकोला येथील सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत मोहम्मद हुसेन मोहम्मद आजम यांची त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल निवड करण्यात आली आहे.

         मोहम्मद हुसेन यांनी यापूर्वीही बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत असताना शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. सदर पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा २९ ऑक्टोबर २०२३ रोजी गालिब अकॅडमी, नवी दिल्ली येथे होणार आहे.यानिमित्ताने सर्व मित्र परिवार, अधिकारी पदाधिकारी, सहकारी शिक्षकांच्या वतीने मोहम्मद हुसेन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात असून त्यांच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.