Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत- शेख अब्दुल रहीम

Responsive Ad Here


असलम परवेज

|औरंगाबाद|       महाराष्ट्र राज्यातील व औरंगाबाद जिल्ह्यातील मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक बंधू-भगिनिंसाठी दरवर्षी प्रमाणे सलग 10व्या वर्षी ही हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनतर्फे राज्य स्तरीय व जिल्हास्तरीय मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमांच्या सर्व शिक्षक-शिक्षकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आपले आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी केली आहे. 

       राज्य स्तरावर मराठी माध्यमातुन २ आदर्श शिक्षक पुरस्कार, उर्दू माध्यमातून २ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  तसेच जिल्हास्तरीय मराठी मध्ये मनपा-१ , खाजगी-१ , जिल्हा परिषद-१ असे ३ आणि उर्दू माध्यम मध्ये जिल्हा परिषद-१ , खाजगी-१ , मनपातुन एक एक शिक्षक तसेच मराठी माध्यमातून १ चित्रकला शिक्षक आणि उर्दू माध्यमातून चित्रकला शिक्षक तसेच मराठी माध्यमातून १ क्रीडा शिक्षक व उर्दू माध्यमातून १ क्रीडा शिक्षक असे एकूण १४ शिक्षिका-शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरुस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. तरी  राज्यातील व विशेषता: औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षिकांनी आपले प्रस्ताव 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पाठवावे.  काही अडचण किंवा शंका असल्यास  हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांच्या मोबाईल क्रमांक 9657524545 वर  संपर्क साधून आपला प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.