Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रावेर लोकसभा संपर्क प्रमुख पदी डॉ.मनोहर पाटील

Responsive Ad Here

जामनेर

    देशात लोकसभेचे बिगुल वाजलेले असतांना सर्वच राजकीय पक्षांकडुन लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरु झालेली दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन सुध्दा रणनिती आखली जात असतांना रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादीची विषेश तयारी दिसत आहे.याच पार्श्वभुमीवर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एकनाथराव खडसे आणि जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांच्या सुचनेनुसार रावेर लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदी जामनेर येथील डॉ.मनोहर गजमल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

                      डॉ.मनोहर पाटील यांना जामनेर सह लोकसभेतील सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या परिस्थितीची माहीती आणि निवडणुकांचा दांडगा अनुभव असल्याने त्यांना हि जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे. 

                   प्रत्येक विधानसभा मतदार संघात जाऊन लोकसभेच्या दृष्टीने पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागा अशा सुचना नियुक्ती करतांना जयंतराव पाटील यांनी डॉ.मनोहर पाटील यांना दिल्या.

                       प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार,प्रदेश कार्यकारणी सदस्य संजयराव गरुड,जामनेर तालुकाध्यक्ष विलास राजपूत हे उपस्थित होते.

                  लोकसभा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी मंत्री एकनाथराव खडसे,माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,माजी मंत्री सतिष पाटील,माजी मंत्री गुलाबराव देवकर,राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे,जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील,महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी,माजी आ.कैलास पाटील,डिगंबर पाटील,जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब पाटील,जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील,दगडू पाटील,प्रदीप लोढा,कैलास पाटील,अनिल बोहरा,माधव चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन केले जात आहे.