प्रतिनीधी हिवरखेड::जितेश कारीया
बुलडाणा अर्बन चे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर साहेब मा. डॉ. श्री. सुकेशजी झंवर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला विभागाचे विभागीय व्यवस्थापक विठ्ठल दळवी , उमाकांत राखोंडे यांच्या मार्गदर्शनात शाखा तेल्हारा तर्फे आज श्रीनाथ वृद्धाश्रम दहिगांव येथे शाखेचे स्थानिक संचालक श्री.पवनभाऊ चांडक, श्री.अरविंदभाऊ अवताडे व शाखा व्यवस्थापक श्री.रामदास भालेराव यांचे हस्ते वृद्ध व्यक्तींना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाखेचे कर्मचारी मुरलीधर मंत्री, नितीन तिव्हाणे , पवन बासू, सौ. सीमा फाफट मॅडम, कु.चंचल बजाज मॅडम, संतोष वाने, सुनील दांडगे,मंगेश मानकर, सौ. कमल मोरे, रमेश कराळे, नंदु ठाकूर यांची उपस्थिती होती.
