"बूथ लेवल कमीटीच्या माध्यमातून प्रभागाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार- तौफिक कुरेशी"
असलम परवेज लोणार
सर्व विधानसभांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपणार आहे. त्यामुळे आता निवडणुका घेण्याची घोषणा निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे. अशातच आगामी नगरपालिका, विधानसभा/लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
त्या अनुषंगाने महराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये व ज़िल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार लोणार शहरात प्रत्येक प्रभागामध्ये बूथ लेवल कमेटी गठीत करण्याचे सुचना प्राप्त होताच, लोणार येथील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी जलद गतीने कामाला लागल्याचे चित्र आहे.
यातच प्रभाग क्र.१ च्या नगर सेविकापती तथा भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष तौफीक कुरेशी यांनी सर्व प्रथम प्रभाग क्र.१ मध्ये ४१ सदस्यी अर्थात सर्वात मोठी बूथ लेवल कमीटी गठीत करून लक्ष्मणदादा घूमरे यांच्या मार्फत लोणार शहर अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या सुपूर्द करुन पुढील हालचालींना वेग दिला आहे.
यावेळी नंदूभाऊ बोरे, प्रकाशभाऊ धुमाळ, इंदिरा गांधी ज्यु. कॉलेजचे अध्यक्ष शेख गफ्फार कुरेशी, सदस्य अब्दुल कादर कुरेशी, अण्णाभाऊ साठे फाॅरमचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पटोळे, हाजी अफसर खान, शेख अय्यूब खान साबुणकर, नगर सेवक सतीश राठोड, संतोष मापरी, माजी नगर सेवक शेख करामत, ओबीसी सेलचे अमदास इंगळे, दौलत मानकर,मतीन खान,आसिफ खान,रऊफ खान,अरबाज़ कुरेशी, साहिल खान, शेख सजाद, शेख जुनेद, NSUI विद्यार्थी कांग्रेसचे बुलढाणा ज़िल्हा उपाध्यक्ष मो.आकिब कुरेशी इत्यादींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
