Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीस भेट

Responsive Ad Here


हीवरखेड प्रतिनिधी जितेश करीया 

तेल्हारा तालुक्यामध्ये  तालुक्या तील विविध विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मौजे हिंगणे बु. येथील प्रगतशील शेतकरी श्री आशिष सदाफळे यांच्या संत्रा फळबागेची पाहणी केली. सदाफळे यांनी काळीची जमीन असताना सुद्धा अतिशय आधुनिक तंत्रज्ञान वापरून तसेच मेहनतीने संत्राबाग  नियोजनबद्ध रित्या फुलवली आहे. त्याच अनुषंगाने तेल्हारा तहसीलदार  डॉ. संतोष येवलीकर,तेल्हारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमितकुमार  मुंडे, तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत, नायब तहसीलदार विकास राणे, सहाय्यक विद्युत अभियंता  राठोड तथा पंचायत समिती कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण अशा अधिकारी वर्गाने संत्रा बागेची पाहणी करून सदाफळे यांच्याकडून त्यांची नियोजन जाणून घेतले. 

तालुक्या तील नवनवीन तंत्रज्ञान वापरणारे प्रगतशील शेतकरी यांचा उत्साह वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कृषी विभागामार्फत सर्व अधिकाऱ्यासमवेत प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.बेलखेड येथील रहिवासी असलेले आशिष सदाफळे यांनी हिंगणी शिवारामध्ये असलेल्या पाच एकर क्षेत्रावर संत्रा बागेची लागवड 2017-18 मध्ये केली. संत्रा बागेमध्ये ठिबक सिंचनाद्वारे उत्कृष्ट पद्धतीने पाण्याचा वापर, फवारणी व एकात्मिक अन्नद्रव्य  व्यवस्थापन त्याचे नियोजन तसेच गुणवत्तापूर्वक फळ निर्मितीसाठी आधुनिक संजीवकाचा वापर याद्वारे त्यांची बाग निर्यातक्षम  फळे निर्मिती करू शकत आहे.

 तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात फळबागकडे वळावे असे आवाहन सदर प्रक्षेत्र भेटीवेळी तहसीलदार तेल्हारा यांनी केले.या भेटी वेळी पंचायत समिती सदस्य मो इंद्रीस,यांची व इतर शेतकरी वर्गाची उपस्थिती होती.