Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

'ईव्हीएम हटाव'च्या मागणीसाठी वकील संघाचे निवेदन

Responsive Ad Here

आज देशामध्ये जी अराजकता  निर्माण होत आहे, त्याचे मुळाशी सत्ताधारी लोक सत्तेचा दुरूपयोग करून जाती जातीमध्ये  द्वेष पसरविण्याचे काम करीत आहे. व त्याचा फायदा निवडणुकीसाठी व्हावा हा त्यांचा मुख्य हेतु आहे. असे निवेदन वकील संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना देण्यात आले आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे. सरकारची भुमीका संदिग्ध आहे. या सर्व गोष्टीचे मुळाशी सत्ताधारी लोकांना सत्तमध्ये आणणेचे काम ईव्हीएम मशीनद्वारे केले जात आहे. निवडणुक आयोगापासून तर न्यायालया पर्यंत सर्व स्वायत्त संस्था सरकारच्या दबावाखाली काम करीत आहे. ही परिस्थिती बदलली नाहीतर, येणारे काळात चुकीचे लोक पुन्हा सत्तेत येतील व संविधान तसेच आमची लोकशाही घोक्यात येणार आहे व त्याचे भिषण चित्र आजच आम्ही पाहत आहोत. त्यामुळे सदरहु निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनद्वारे न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे निवेदन देतेवेळी ॲड.साहेबराव मोरे, ॲड.दिलीप बगाडे, ॲड.स्नेहल तायडे, ॲड.मजीत कुरेशी, गोपाल राजापुरे , ॲड.वैभव खराटे ॲड. एम.वाय. इंगळे, ॲड.जे.डी. तायडे , ॲड.एस.डी. मराठे, ॲड.एम.सी. रावळ, आदींच्या सह्या आहे

निवेदन देतेवेळी ॲड.साहेबराव मोरे, ॲड.दिलीप बगाडे, ॲड.स्नेहल तायडे, ॲड.मजीत कुरेशी, गोपाल राजापुरे , ॲड.वैभव खराटे ॲड. एम.वाय. इंगळे, ॲड.जे.डी. तायडे , ॲड.एस.डी. मराठे, ॲड.एम.सी. रावळ, आदींच्या सह्या आहे