राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरित होऊन स्थापन झालेली सन्मान अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तेल्हारा शाखा हिवरखेड - ह.भ.प. गाडेकर महाराज
हिवरखेड (प्रतिनिधी) जितेश कारिया
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंतीच्या शुभपर्वावर हिवरखेड नगरीमध्ये सन्मान अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तेल्हारा शाखा हिवरखेड चा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन ह. भ. प. शुकदास महाराज गाडेकर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुलभाताई रमेशजी दुतोंडे सदस्य जिल्हा परिषद अकोला या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सौ. गोकुळाताई महेंद्रजी भोपळे सदस्य पं. स. तेल्हारा, सौ वैशालीताई गणेशराव वानखडे सरपंच ग्रामपंचायत हिवरखेड, श्री सुनीलभाऊ इंगळे सभापती कृ. उ. बा. समिती तेल्हारा, श्री जमीरउल्ला खा पठाण मा. उपाध्यक्ष जि. प. अकोला, मा. श्री. डॉ. शकील अली मिरसाहेब मा. उपसरपंच ग्रामपंचायत हिवरखेड, मा. श्री. प्रकाश पाटील गावंडे पोलीस पाटील हिवरखेड, मा. श्री सुरेशचंद्र कृष्णदेवजी गुप्ता, मा. श्री. रमेशभाऊ दुतोंडे उपसरपंच ग्रामपंचायत हिवरखेड, मा. श्री. दिपकजी किशोरजी बोहरा, मा. श्री प्रवीणजी येऊल शहराध्यक्ष भाजपा, मा. श्री अनिलकुमार सहदेवरावजी भोपळे अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था हिवरखेड, मा. श्री संदीपजी महादेवरावजी इंगळे माजी सरपंच ग्रामपंचायत हिवरखेड, मा. श्री. महादेवराव तोरखडे, मा. श्री. पंकजजी पुरुषोत्तमजी अग्रवाल, मा. शिवाजीराव रामकृष्णरावजी नराजे यांची उपस्थिती लाभली.
सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या मनोगतातून सन्मान अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तेल्हारा शाखा हिवरखेड यांच्या विषयी आत्मीयता व विश्वास दिसून आला तसेच बँकेच्या प्रगती करिता सर्वतोपरी सहकार्य देण्याचा विश्वास सर्व मान्यवरांनी दाखवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेशजी रोठे सर यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून सन्मान अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तेल्हारा शाखा सोनाळा येथील कार्यप्रणाली व अभिलेख यांचे विचार मांडले. हिवरखेड शाखेची रचना व कार्यपद्धती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयूर लहाने तर आभार डॉ. संदीपराव इंगळे यांनी मानले.
