"लोणार शहर काँग्रेस कमिटी व कुरेशी समाजात आनंद; शाल श्रीफळ आणी पुष्पहार द्वारे सत्कार व सन्मान"
असलम परवेज:लोणार प्रतिनिधी
लोणारचे माजी सरपंच हाजी अब्दुल लतीफ कुरेशी यांचे चिरंजीव तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकारी, नगरसेवक मोहम्मद तौफिक कुरेशी यांची ऑल इंडिया जमियतुल कुरेश ॲक्शन कमिटीच्या दिनांक ५ मार्च २०२४ च्या एका आदेशान्वये ऑल इंडिया जमियतुल कुरेश 'महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस' पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तौफिक कुरेशी यांच्या कामाची दखल घेत काँग्रेस पक्षांनी अगोदरच त्यांच्यावर विश्वास दाखवत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या 'अल्पसंख्यांक सेलच्या तालुकाध्यक्ष, पदाची जबाबदारी सोपविलेली आहे. सामाजिक कार्यामध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात. लोणार येथील अंजुमन उर्दू प्राथमिक शाळेचे ते विद्यमान सदस्य आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अशासकीय कमिटीचे सदस्य असून या माध्यमातून सुद्धा जनतेच्या कामांना वेग मिळण्याच्या दृष्टीने ते नेहमीच आपली जबाबदारी बजावताना दिसतात. नगरपरिषद लोणार मध्ये त्यांनी या पंचवार्षिक मध्येच बांधकाम सभापतीची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सोपविलेल्या विविध कामांना व जबाबदाऱ्यांना ते पार पाडण्यामध्ये यशस्वी ठरतात. त्यामुळेच ते पक्ष श्रेष्ठांचे व विशेषता: मुकुलजी वासनिक यांचे लाडके मित्र तथा कार्यकर्ते ठरले आहे.
या वेळी लोणार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध ठिकाणी त्यांचा सत्कार केला गेला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा घुमरे, न.प लोणार काँग्रेसचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष भुषण मापारी, अण्णाभाऊ साठे फोरमचे प्रदेशाध्यक्ष साहेबराव पाटोळे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मा. उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद,मा. शहराध्यक्ष नितीन शिंदे, नगरसेवक शेख रमजान सर, नगरसेवक रऊफ भाई,ओबीसी सेलचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अंबादास शिंदे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे ,युवक काँग्रेस मेहकर मतदार संघ प्रमुख भरत राठोड, सरपंच गोविंद राऊत, अमोल, इंगळे सह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी तौफिक कुरेशी यांच्या निवासस्थानी सुद्धा लोणार कुरेशी समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली व शाल श्रीफळ आणी पुष्पहार द्वारे त्यांचा सत्कार व सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजचे सदस्य अब्दुल कादर कुरेशी, इकबाल कुरेशी, लुकमान कुरेशी, रफिक मिस्री,हमीद व्यापारी, आवेज कुरेशी, जुबेर कुरेशी, आकीब कुरेशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
