ग्रामीण प्रतिनिधी-
बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा कमान येथे शेतकऱ्यांना २४ तास थ्री फेस विद्युत सप्लाय देण्यात यावे, यासाठी आदमपूर व परिसरातील शेतकरी तथा माजी सरपंच प्रभाकर पेंटे यांच्या नेतृत्वाखाली देगलूर व बिलोली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आदमपूर फाटा येथे दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भव्य रास्ता रोको करण्यात आला. यावेळी प्रभाकर पेंटे यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हणाले की २४ तास थ्री फेस लाईट शेतकऱ्यांना देण्यात यावे, तसेच लाईट चालू असताना परमिट घेण्यात येऊ नये,जर परमिट घेतलात तर जेवढा परमिटला वेळ लागतो तेवढाच वेळ लाईट थ्री फेस शेतकऱ्यांना देण्यात यावे, तसेच पक्ष राजकारण बाजूला ठेवून हा आमचा लढा शेतकऱ्यांसाठी आहे.सर्व शेतकरी एकजुटीने पाहिजे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी व हक्कासाठी हा आमचा लढा आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. फक्त मनायला आहे, परंतु येथे शेतकरी लाईट अभावी मरत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे.
शहरांमध्ये डीपी जळाले तर खराब झाले तर अवघ्या दोन तासातच मिळतो आम्ही काय लाईट बिल भरत नाही काय,येथे मात्र बारा ते पंधरा दिवस लागतात मग तोपर्यंत आमचे पीक करून जाते.हा अन्याय शेतकऱ्यांवरच का?शहरी भागासाठी का नाही? सध्या दुष्काळ परिस्थितीमुळे पाण्याअभावी व लाईट अभावी पिके करपून जात आहेत. लाईटच्या नावाने अशी बोंबाबोंब होत आहे.तरी आम्हाला आठ तासाऐवजी शेतकऱ्यांसाठी २४ तास थ्री फेस लाईट देण्यात यावी. अशी जोरदार मागणी करण्यात आली. कोणत्याही पक्षाचा आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आमच्या शेतकऱ्यांसाठी २४ तास थ्री फेस देण्यात यावी, असे म्हणत रस्त्यावर उतरावे, जर शासन नाही ऐकले तर राजीनामा द्यावे. कोण्याही आमदार व खासदार मंत्र्यांमध्ये हिम्मत आहे काय? जे कोणी करेल त्यांच्या मागे आम्ही बिलोली-देगलूर तालुक्यातील सर्व शेतकरी सदैव उभे राहू, असे आपल्या भाषणातून प्रभाकर पेंटे यांनी ठणकावून सांगितले आहे. आंदोलन स्थळी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता वैरागडे, तसेच उप अभियंता चाटे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
याउपर वीज मंडळ ऐकले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय व नांदेड महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पेंटे यांनी दिला.अभियंता म्हणाले की, सध्या आम्ही आठ तास लाईट देऊ जर परमिट घेतले असता जेवढा वेळ परमिट साठी लागतो तेवढाच वेळ थ्री फेस लाईट मी सर्व शेतकऱ्यांना देगलूर व बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांना देईन व २४ तास थ्री फेस विजेसाठी मी आपली मागणी वरिष्ठांकडे पाठवतो असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी देगलूर व बिलोली तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केरूर आटकळी, टाकळी,गळेगाव, थडीसावळी, चीटमोगरा, बोरगाव, मिनकी, मुतण्याळ, शहापूर, मिणकीचे माजी सरपंच नाईक, केरूरचे माजी सरपंच बालाजी सुगावे, अटकळीचे माजी सरपंच शिवाजी डोंगरे, शिवसेना नेते विजय मुंडकर, बिलोली पंचायत समिती माजी सभापती प्रतिनिधी गंगाधर अनपलवार, शहापूर येथील गोपाळ रेड्डी, सायलू यालावार, मलनरेड्डी यालावार, बालाजी बिद्राळे, बजरंग शिंदे,शिवदास हालबुर्गे,भागतील पत्रकार अनेक गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. एक ते दीड तास रास्ता रोको करण्यात आला.त्या ठिकाणी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. हे रास्ता रोको आंदोलन १००% यशस्वी झाले आहे. रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनि विक्रम हराळे व त्याची पूर्ण टीम तसेच एक एसआरपीएफ तुकडी तैनात करण्यात आली होती.
%20(1).jpg)