Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तळेरे जिल्हा परिषद आदर्श शाळा क्र. १ चा पर्यावरणपूरक उपक्रम; विद्यार्थ्यांनी बनवले सुगंधी उटणे

Responsive Ad Here

 


कौशल्यविकासासोबत व्यवहारज्ञानाचे धडे; विद्यार्थ्यांचा दिवाळीनिमित्त उपक्रम

ग्रामीण प्रतिनिधी 

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. दिवाळीच्या पहाटे अभ्यंगस्नान, सुगंधी उटणे, अंगणातील तुळशीसमोर कारेट फोडण्याची परंपरा आणि बालपणीच्या आठवणी यांना विशेष महत्त्व आहे. अभ्यंगस्नानासाठी वापरले जाणारे सुगंधी उटणे हा दिवाळीच्या परंपरेतील एक अविभाज्य भाग आहे. हीच परंपरा जपत विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकास, श्रमप्रतिष्ठा आणि व्यवहारज्ञान रुजविण्याच्या उद्देशाने तळेरे येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा क्र. १ ने पर्यावरणपूरक व रसायनविरहित उटणे निर्मितीचा उपक्रम यंदाही राबविला आहे.

शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर आणि सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष कृतीतून काहीतरी शिकावे, स्वतःच्या मेहनतीचे महत्त्व समजून घ्यावे आणि तयार केलेल्या वस्तूंची विक्री करताना व्यवहारज्ञान मिळवावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे यंदाही विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांनी स्वतः उटणे तयार करण्याबरोबरच त्याचे पॅकिंग करण्याची जबाबदारीही पार पाडली. या प्रक्रियेतून त्यांना वस्तुनिर्मिती, स्वच्छता, मेहनत, संघभावना आणि कामातील नियोजन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची प्राथमिक माहिती मिळण्यासही मदत होणार आहे.या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा देवकी तळेकर, उपाध्यक्ष अनुष्का गोसावी, सरपंच हनुमंत तळेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि पालकवर्ग यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सहकार्य केले.

*पुस्तकी शिक्षणासोबत कृतीतून शिक्षणाची गरज*

आजच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये शिकविणेही महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होते, श्रमाचे महत्त्व समजते आणि व्यवहारज्ञान विकसित होते. पर्यावरणपूरक वस्तू तयार करण्याची सवय लागल्याने पर्यावरणाविषयीची जाणीवही वाढते. त्यामुळे तळेरे शाळेने राबविलेल्या या उपक्रमाप्रमाणेच अन्य शाळांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे कृतीशील उपक्रम राबविणे गरजेचे आहे.