Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री बालाजी महाराज आश्विन यात्रा उत्सवास प्रारंभ

Responsive Ad Here

 


देऊळगाव राजा (प्रतिनिधी) मनोहर खंदारे 

दिनांक ११ ऑक्टोबर 

प्रतितिरूपती अर्थात विदर्भाचे तिरुपती बालाजी म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या शहरातील श्री बालाजी महाराज मंदिरामध्ये आश्विन शु. १ रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना करून श्री बालाजी महाराजांच्या आश्विन यात्रा उत्सवास सुरुवात झाली.

 श्री बालाजी महाराजांच्या मंदिरावर दरवर्षीप्रमाणे विधिवत पूजन करून नवीन पताका फडकविण्यात आली. ३३४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराज मंदिरामध्ये सकाळी मानकरी सुवर्णकार समाजाने दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे विधीवत श्री बालाजी महाराजांचे सोन्याचे दागिने, सिंहासने तथा चांदीचे पूजेचे साहित्य उजळून दिले. 

श्री बालाजी संस्थानच्या वतीने सुवर्णकार समाजाचा, या सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. श्री बालाजी महाराजांचा यात्रा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी २१ ब्राम्हणवृंद श्रींच्या मंदिरात अनुष्ठानास बसले. श्री बालाजी महाराज, लक्ष्मीमाता व पद्मावतीमाता यांच्या मूर्तींचे ब्राह्मणवृंदांच्या मंत्रोच्चारात पूजारी यांनी विधीवत अभिषेक केले.

 यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली. सायंकाळी असंख्य भक्तांच्या उपस्थितीत श्री बालाजी महाराजांची महाआरती करण्यात आली. घटस्थापनेप्रसंगी श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापक किशोर बीडकर, संस्थान कर्मचारी, मानकरी, ब्राम्हणवृंद व श्री बालाजी भक्त मंदिरामध्ये उपस्थित होते.

आश्विन शु. ८ सह ९ सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी मंडपोत्सव होणार असून आश्विन शु. ९ सह १० मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मध्यरात्री १२ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येईल. श्रींची पालखी आश्विन शु. १०, बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालून मंदिरात पोहचेल. आश्विन कृ. ४ गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सूर्योदयी ५ वाजून ४५ मिनिटांनी लळित उत्सव संपन्न होईल, अशी माहिती श्री बालाजी संस्थानच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.