Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नवरात्रोत्सवात फुलाचा दरवळ महागणार?

Responsive Ad Here

बुध   दि  [ प्रकाश राजेघाटगे ] 

सुरवातीला शेवंती भाव खाणार. शेवटी झेंडूचा दर फुलणार.

पुजेसाठी फुलांची मागणी वाढणार.शेतकऱ्यांना दराची आस.

 आजपासून शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात होत आहे. उत्सव काळात दहा दिवस पूजेसाठी देवीला माळ घालण्यासाठी, सजावट करण्यासाठी फुलांची गरज असल्याने नवरात्रोत्सव काळात फुलांचा दरवळ महागणार काय याची उत्सुकता फुल उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे.

फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने गणपती, दसरा दिवाळी महत्वाचे सण आहेत. सणासुदीला बाजारात फुलाची मागणी वाढते. उत्सव काळात आरतीला हार आणि पूजेसाठी फुलांची आवश्यकता असते. तसेच सजावटीसाठी देखील फुलांचा वापर करण्यात येतो.

 नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत  बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. उत्सवात फुलांची मागणी असल्यामुळे दर वाढल्यास चार पैसे हातात येतील या आशेने फुल उत्पादक शेतकरी देखील दराकडे डोळे लावून बसतो. यंदा बाजारात बाजारात झेंडूच्या फुलाची आवक चांगली आहे.

सरासरी 50 टक्के माल डागी येत आहे डागी मालाचे दर अद्याप चढलेले नाहीत. चांगल्या गुणवत्तेच्या मालाचा दर 60 ते70 रुपये किलो बाजारात आहे.घटस्थापनेसाठी शेवंती, झेंडू आणि निशिगंधाच्या फुलांना जास्त मागणी असते. उत्सव काळात नियमित देवपूजा, देवीला हार,घटाला माळ याकरिता फुलांची गरज असते .

मंडळाच्या सजावटीसाठीही फुलांची मागणी वाढते .सध्या 50 ते 60 रुपये किलो मिळणारी झेंडूची फुले मागणी वाढली तर शंभरी पार करतील अशी चर्चा  व्यापाऱी वर्गात आहे नवरात्रोत्सव काळात फुलांची दरवाढ कायम राहण्याची असण्याची शक्यता आहे. 

दसऱ्या दिवशीही पुजेसाठी,हार करण्यासाठी फुलांची  मागणी वाढते त्यामुळे फुलांचे दर वाढण्याची शक्यता फुल उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.सध्या झेंडू, गुलाब, पांढरी शेवंती, गलांडा, निशिगंध, कमळ, छोट्या गुलाब फुलांचे दर वाढले आहेत. पाऊसाने उघडीप दिली आहे आणि उन्हाची तीव्रता वाढत आहे. 

पाण्याची उपलब्धता कमी असल्याने नवीन बागा लावण्याचे धाडस शेतकऱ्यांनी केलेले नाही. बाजारात फुलांची आवक कमी आहे. मागणीमुळे फुलांच्या दरात वाढ झाली आहे. मोठ्या आकाराची मूर्ती असलेल्या सार्वजनिक दुर्गा देवी मंडळांसह, घरगुती घटाला माळेसाठी फुलांची मोठी मागणी आहे. 

फुले महागल्याने हारांचे दरही वाढले आहेत.हारांचे दर किमान ५० ते २५० रुपयांपर्यंत वाढले आहेत. सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या दुर्गामातेच्या मूर्तीसाठीचे हारांचे दर किमान २५० पासून २ हजारांपर्यंत आहेत. घटस्थापनेसाठी झेंडूच्या आणि निशिगंधाच्या फुलांना जास्त मागणी असल्यानेही दर वाढले आहेत.

 ही दरवाढ कायम राहणार असून, दसऱ्याला फुलांचे दर वाढण्याची शक्यता मुंबई, आणि मिरज येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली 

फुलांचे दर (प्रतिकिलो)

झेंडू 60 ते 70, गुलाब 200 ते 250 शेकडा, पांढरी शेवंती 160 ते 200, गलांडा 120 ते 140, निशिगंध 160  ते 250, कमळ 30 ते 40 छोटी गुलाबाची फुले 300, लिली 600 जरबेरा 40 ते45

चौकट 

सुरवातीला शेवंती भाव खाणार. शेवटी झेंडूचा दर फुलणार.

नवरात्रोत्सवात घटस्थापना झाल्यावर शेवंतीच्या फुलाचा वापर देवीला वेणीसाठी केला जातो.त्यामुळे सुरवातीच्या काळात शेवंतीची मागणी वाढणार असल्याने मार्केटमध्ये शेवंती भाव खाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात पूजेसाठी, सजावटीसाठी, हारासाठी झेंडूच्या फुलांची मागणी वाढते त्यामुळे अंतिम टप्प्यात झेंडूचा दर फुलणार असल्याची चर्चा फुल मार्केटमध्ये सुरू आहे.

चौकट 

झेंडू शंभरी पार करेल 

गणेशोत्सवात झेंडूचा दर 60 ते70 रुपयांपर्यंत राहिला होता. सध्या बाजारात झेंडूच्या फुलांची आवक कमी झाली आहे. पाऊसाने ओढ दिल्याने माल कमी आहे. मागणी वाढत असल्याने गोंडा (झेंडू) दसऱ्याला  शंभरी पार करेल. माल टिकला तर दसरा आणि दिवाळीत दर चांगला राहील.

विठ्ठल रामचंद्र लोखंडे (फुल व्यापारी) मीनाताई ठाकरे फुल मार्केट दादर.