Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रांजणगाव, बासरच्या निवेदनाची दखल, पाझर तलावातील पाणी उपसा बंद करण्यासाठी प्रशासनाची कारवाई.

Responsive Ad Here





रांजणगाव, बासर : पाझर तलावातील पाणी उपसा बंद करून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षित करण्याच्या मागणीसाठी रांजणगाव व बासर ग्रामस्थांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार तसेच कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, धुळे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनाची प्रशासनाने दखल घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाझर तलावातील पाणी उपसा करणाऱ्या मोटारींचा वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर बंद करण्याची कारवाई केली. त्यामुळे पाझर तलावातील पाणीसाठा आरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या कारवाईमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.