Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

श्री रंगनाथ महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालय वाघरूळ येथे डॉ. ए.पी.जे.कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहातसाजरा केला

Responsive Ad Here

 



अनिल चव्हाण ( प्रतिनिधी जाफराबाद )

दि. 16 ऑक्टोबर २०२६


 श्री रंगनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, वाघरूळ येथे भारतरत्न, मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची ९४ वी जयंती 'वाचन प्रेरणा दिन' व 'विद्यार्थी दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. यु. आर. म्हस्के सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी एज्युकेशन संस्थेचे सहसचिव व संचालक श्री. गजाननभाऊ म्हस्केसर, तर विशेष अतिथी म्हणून पोखरी गावचे उपसरपंच श्री. दत्ताभाऊ घडलिंग साहेब उपस्थित होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री. एम. एस. कोरडे सर, प्रा. टि.के शेवाळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीएपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर माहिती दिली ते केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर ते एक महान शिक्षक होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. वाचाल तर वाचाल हा मंत्र प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारला पाहिजे."

 मोबाईलच्या आहारी न जाता दररोज एक तास पुस्तकासाठी दिला पाहिजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुस्तकांच्या माध्यमातून मोठी स्वप्ने बघावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्द ठेवावी, असे आवाहन केले.

*पुस्तक रुपी वैचारिक रथाचे विशेष आकर्षण*

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने महाविद्यालयात रामकृष्ण मिशन, छत्रपती संभाजीनगर या संस्थेचा 'पुस्तक रुपी वैचारिक रथ' उभारण्यात आला होता. या रथामध्ये स्वामी विवेकानंद, डॉ. कलाम यांच्या जीवनावरील पुस्तकांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचे मन लावून वाचन केले व दररोज नियमितपणे किमान ३० मिनिटे वाचन करण्याची शपथ घेतली.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.