कळंबोली प्रतिनिधी:श्री.अवधूत साळुंखे कळंबोली परिसरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे शाखाप्रमुख स्वप्नील घाडगे यांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाविरोधात उपोषण सुरू केले आहे.
कळंबोलीमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर स्वप्नील घाडगे यांनी सिडको प्रशासनाला पत्राद्वारे कळवूनही प्रश्न मार्गी न लागल्याने उपोषणाचे पाऊल उचलले आहे.
या उपोषणाला भाजपच्या महिला कार्यकर्त्या सौ. रत्नमाला शिंदे यांनी प्रत्यक्ष सहभागी होत जाहीर पाठिंबा दिला. कळंबोलीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
आता सिडको प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन कळंबोलीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कधी मार्गी लावणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
