मेहकर(विष्णु आखरे पाटील )
मेहकर येथील समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी च्या वतीने दि 26 मे रोजी महाराष्ट्राचे लोकनेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली असून त्यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त पाचशे गोरगरीब जनतेला सँनिटायझर चे वाटप करण्यात आले यावेळी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण संस्थेचे अध्यक्ष अॅड शैलेश देशमुख, माजी सभापती सतीश ताजणे, अॅड विनोद नरवाडे,संस्थेचे संचालक किशोर धोंडगे, रजनीकांत कांबळे, संस्थेचे व्यवस्थापक रामेश्वर मोरे,रविंद्र कुंभार यांनी अर्पण करून संस्थेतर्फे प्राथमिक रित्या दहा गरजूंना सँनिटाझरचे वाटप करण्यात आले असून उर्वरित गरजूंना घरपोच सँनिटायझर वाटप करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम सुरक्षित अंतर पाळून करण्यात आला.यावेळी संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते
