Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आदर्श विवाहाने कृष्णा सासवडकर ठरले समाजभूषण हुंडा तर घेतलाच नाही, पण बायकोला शिकविण्याचा केला निर्धार

Responsive Ad Here

नयन खरात  @ तालुका प्रतिनिधी मेहकर

मेहकर, ता. 28: 
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रांगोळीकार कलाशिक्षक कृष्णा विश्वनाथ सासवडकर यांचा विवाह
पल्लवी प्रकाश शिंदे यांच्यासोबत 27 एप्रिल रोजी उकळी येथे पार पडला. वर आणि वधू दोघेही उकळी गावचे रहिवाशी आहेत. या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे नुकतीच लाॅकडाऊन सुरुवात झाली होती. अशावेळी मेहकर परिसरात सासवडकरांचा पहिला विवाह सोहळा ठरला, जो अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. 
सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेणारे कृष्णा सासवडकर यांचा विवाह आदर्श नसेल तर नवलच!  त्यांनी वधू पित्याकडून हुंडा तर घेतलाच नाही,पण बायकोला शिकविण्याचा निर्धार मात्र हमखास केला. आपल्या कलेमुळे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर,माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार प्रतापराव जाधव, सुप्रसिद्ध व्यावसायिक नाना उजवणे यांच्यासह महाराष्ट्रभरातील अनेक दिग्गज सासवडकर यांना व्यक्तीशः ओळखतात. सासवडकर आतापर्यंत त्यांनी हजारो वर-वधूंची रांगोळी साकारली आहे. त्यांचा कलाकृतीमुळे लग्नमंडपाला रौनक प्राप्त होते, हे विशेष! छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांसह अनेक संतांच्या रांगोळी त्यांनी साकारल्या आहेत. माझी आई आणि माझा बाप पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे मुख्य आकर्षणही सासवडकर यांची कलाकृती ठरली होती. विशेष म्हणजे, हुंडा न घेता लग्न करणार्‍यांची संख्या कमी आहे. त्यातच लग्नानंतर बायकोला घडविण्याचा विचार करणारे तर तुरळच! ग्रामीण भागातील युवकाने क्रांतीची ही ज्योत निर्माण केली. यामुळे कृष्णा सासवडकर हे आधुनिक समाजभूषण ठरले, हे मात्र नक्की!!