जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आसलगाव उपबाजारपेठेत मंगळवार, 26 मेपासून जनावरांचा बाजार पूर्ववत भरण्यास सुरुवात होणार असून, शेतकरी आणि व्यापार्यांनी बाजारात जनावरे आणावीत, असे आवाहन बाजार समितीच्या सभापतींनी केले आहे.
जळगाव जामोद परिसरात
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. तालुक्यात आसलगाव ही एकमेव गुर -ढोरांची बाजारपेठ आहे. पेरणीचे दिवस जवळ आल्याने जनावरांची खरेदी-विक्री शेतकर्यांना आवश्यक झाली आहे. पेरणीसाठी अजूनही अनेक शेतकरी बैलांचा वापर करतात. ही बाब ओळखून अनेक व्यापार्यांनी जास्तीच्या दराने बैल विकण्यास सुरुवात केली होती. यामुळे शेतकर्यांची पिळवणूक होत होती. ही बाब ओळखून सभापतींनी आसलगावात पुन्हा जनावरांचा बाजार भरविण्याचा निर्णय घेतला. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हा बाजार भरविण्यात येणार असून, शेतकर्यांनी मास्क लावावा. सॅनिटायझर सोबत बाळगावे, असे आवाहन करण्यात आले आहे.