Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोरोना अलर्ट प्राप्त 52 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 02 पॉझिटिव्ह

Responsive Ad Here
वैभव रोकडे@ प्रतिनिधी नांदुरा  ग्रामीण

दि.4 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 54 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 52 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सदर अहवाल मलकापूर येथील 40 वर्षीय पुरूष आणि धरणगांव ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्धेचा आहे. 
   आतापर्यंत 1370 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 77 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 47 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 47 आहे.  सध्या रूग्णालयात 27 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.


   तसेच आज 4 जुन रोजी 54 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 2 पॉझीटीव्ह, तर 52 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 74 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1370 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे. तरी आपण प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे काम असेल तरच घराबाहेर पडावे व प्रशासनाला कोरोना हरवण्यासाठी सहकार्य करावे