काळ बदलला तर परिस्थिती बदलते परिस्थिती बदलली तर सर्वांनाच बदलावी लागते हेसुद्धा अधोरेखित आहे,पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीने शेती होती परंतु आता शेती करण्याची पद्धत सुद्धा बदलली आहे,पूर्वी बैल जोडीने शेतातील पेरणी हे शेतकरी करत होते ,सर्जा, राजाची जोडी गळ्यातील घंटा हलवत डोलत,डोलत, चालत असे,माझ्या सर्जा रे ,माझ्या राजा,रं,गाणं नेहमी तोंडावर यायचं परंतु काळ बदलला परिस्थिती बदलली, आता सर्जा राजा ऐवजी ट्रॅक्टरच,सर्जा
-राजा झाले आहे,लोक बैलजोडी ऐवजी आता ट्रॅक्टरने सर्रासपणे शेती करत आहेयाची कारणे सुद्धा आहेत,एकतर शेतकऱ्यांना चारा मिळत नाही घरची असलेली बेताची आर्थिक परिस्थितीअसे अनेक कारणे सांगता येतील, (बैल जोडी ची पेरणी ही उत्तम असते परंतु काळ बदलला आणि ट्रॅक्टरने पेरणी लवकरात लवकर पूर्ण होते व इतर कामे सुद्धा वेगाने होतात बद्री वायाळ शेतकरी बैलजोडी ने केलेली पेरणी अधिक सोयीचे असते व ट्रॅक्टरने पेरल्यास बियाणे चा दाना खोल जातो,उशिराने बियाणे उगवते,पण काळ बदलला शेतकरी ट्रॅक्टर ने पेरत आहे कृषी सहाय्यक शरद पवार

