Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बाळापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने "मर्दानी महाराष्ट्राची" अभियान संपन्न

Responsive Ad Here
नरेंद्र इंगळे प्रतिनिधी ता. बाळापूर

 बाळापूर दि.१५ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यात कोरोना महामारीच्या संकटात ज्यांनी जनतेसाठी कोरोना योद्धा म्हणुन महत्वाची भूमिका बजावली अशा महिलांसाठी "मर्दानी महाराष्ट्राची" हा उपक्रम बाळापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ता. अध्यक्षा सौ.सुनिताताई ताथोड यांच्यातर्फे राबविण्यात आला. यामध्ये महिला डॉक्टर, नर्स, महिला पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशावर्कर अशा महिलांना बाळापूर तालुक्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 


राष्ट्रवादी महिला काँग्रेस अकोला(ग्रामीण) जिल्हा अध्यक्षा सौ. उज्वलाताई राऊत, जिल्हा सचिव शहनाज शेख, बाळापूर ता.अध्यक्षा सौ.सुनिताताई ताथोड,शिवाजी म्हैसने,विक्की दांदळे,पंकज घोगरे,अंकुश म्हैसने व उमेश घोगरे यांचे हस्ते सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.यावेळी बाळापूर तालुक्यातील कोरोना योद्धा सौ.छाया मात्रे (आशा सेविका), कु.अनिता वानखडे(अंगणवाडी सेविका), कु.विभा पाथरकर(आरोग्य सेविका),डॉ. रोहिणी सोळंके( पोलीसउपनिरीक्षक), डॉ.ताठे मॅडम(आरोग्य सेविका)  यांना सन्मानित करण्यात आले. सौ. सुषमा जयकिरण कावरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, अकोला