Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सम्यकविद्यार्थीआंदोलनअकोला जिल्हाशहराच्यावतीनेनिवेदन देण्यातआले

Responsive Ad Here
नरेंद्र इंगळे बाळापूर ता.प्रतिनिधी 

सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.अश्यातच संपुर्ण महाराष्ट्रात मागासवर्गीय,बौद्ध,भटक्या समाजावर अन्याय अत्याचाराने कळस गाठला आहे.महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर हे प्रकार थांबलेले नाहीत. अचानक वाढलेल्या अत्याचारामुळे वंचित समुहात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नुकतेच नागपूर मध्ये अरविंद बनसोडे या तरुणाची तसेच पुणे येथील विराज जगताप या


 तरुणाची हत्या करण्यात आली.यासारख्या असंख्य वाढत असलेल्या अत्याचाराबद्दल जाब विचारण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने संपुर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी निवेदने देऊन सरकारला जाब विचारण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा बाळापूर तालुका वतीने मा.तहसीलदार साहेबाना  निवेदन देण्यात आले.यावेळी सम्यकचे बाळापूर तालुका अध्यक्ष  शुभम वानखडे , राजेश ददी , श्रेयस वाकोडे, सचिन ददी ,प्रिन्स अवचार ,विकास वानखडे, स्वप्नील वानखडे, गणेश अवचार व समस्त सम्यक विद्यार्थी आंदोल बाळापूर तालुका पदाधिकारी