Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

"त्या" पुलाचे अच्छे दिन येणार !बहुप्रतिक्षित पुलासह पत्रकार भवनाला भरीव निधी देण्याचे आमदार मिटकरींनी दिले वचन

Responsive Ad Here
जितेश कारीया@ हिवरखेड प्रतिनिधी

नवनियुक्त आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या पहिल्याच हिवरखेड दौऱ्यात तीन वर्षापासून पडलेल्या बहुप्रतिक्षित पुलासह पत्रकार भवनाला भरीव निधी  देण्याचे वचन देऊन जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याची प्रचिती दिली.
सर्वप्रथम मिटकरी यांनी हिवरखेड विकास मंच चे संयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तेथे संतोष बजाज यांनी आमदार मिटकरी यांचा आणि सौ. उमा बजाज यांनी सरपंच सौ. अरुणाताई ओंकारे यांचा सत्कार केला. त्यानंतर नियोजित दौऱ्यानुसार मिटकरी यांनी दत्त भारती मंदिर नजीकच्या तीन वर्षापासून पडलेल्या लेंडी नाल्यावरील पुलाची पाहणी केली. 

 *कामचुकारांना धरले धारेवर*

आमदार मिटकरी यांनी आपला मोर्चा सेंट्रल बँकेकडे वळवून तेथे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
त्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक देऊन येथील भोंगळ कारभाराचे पोस्टमार्टम करीत डॉक्टर आणि कर्मचारी अनेकदा उपस्थित नसल्याबाबत आणि पुरेशा सुविधा मिळत नसल्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठांना चांगलेच धारेवर धरले.

 सदर पूल पडल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक निष्क्रिय आणि उदासीन लोकप्रतिनिधिंनी ढुंकूनही न पाहिलेल्या या पुलासाठी निधी द्यावा अश्या मागणीचे निवेदन हिवरखेड ग्रामपंचायत सरपंच सौ. अरुणाताई ओंकारे यांनी अमोल मिटकरी यांना तुटलेल्या पुलावरच दिले. त्यावेळी आमदार मिटकरी यांनी तात्काळ या पुलासाठी निधी मंजूर करणार असल्याचे जाहीर केले. आणि जणूकाही तथाकथित विकास महर्षींच्या निष्क्रियतेवर  शिक्कामोर्तबच केले. आता या पुलाला लवकरच अच्छे दिन येणार असल्याचे निश्चित झाले. यावेळी ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल, विशालराजे बोरे, संदीप इंगळे, सुरेश ओंकारे, महेंद्र कराळे,राजेश पांडव, राहुल गिऱ्हे, जितेश कारिया, अनिल कवळकार, उमर बेग, जावेद खान, अर्जुन खिरोडकार, सूरज चौबे, धिरज बजाज, मनोज कनपटे, वसीम मिर्झा, प्रभाकर जाधव, अर्जुन दाते, विनोद सगने, गुरुदेव इसमोरे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर पत्रकार भवन हिवरखेड येथे शेतकर्‍यांसोबत संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा शॉल श्रीफळ पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच सौ अरुणाताई ओंकारे, सत्कार मूर्ती नवनियुक्त आमदार अमोल मिटकरी, विशालराजे बोरे, माजी सरपंच संदीप इंगळे, सुरेश ओंकारे, मनीष भांबुरकर, डॉ.निलेश वानखडे, श्याम राऊत, सोपान कुटाळे, मिलिंद जाधव, इत्यादी मान्यवर विराजमान होते. सर्व मान्यवरांचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकार भवन मधील फर्निचर इलेक्ट्रिक फिटिंग आणि इतर साहित्यासाठी भरीव निधी देण्याचे ठाम आश्वासन आमदारांनी दिले.