अलाउद्दीन आयुब खली@ प्रतिनिधी सिंधुदुर्ग
हळदीचे नेरूर,शिवापूर,वसोली, केरवडे, गोठोस, वाडोस, कालेली, माणगाव, साळगाव, हुमरस,आकेरी, झाराप, बिबवणे, पिंगुळी, पावशी ग्रा. पं.ना दिल्या भेट कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आज गावभेट दौऱ्या दरम्यान हळदीचे नेरूर,शिवापूर,वसोली, केरवडे, गोठोस, वाडोस, कालेली, माणगाव, साळगाव, हुमरस,आकेरी, झाराप, बिबवणे, पिंगुळी, पावशी या गावातील ग्रामपंचायत मध्ये भेट दिली. कॉरंटाईन व्यवस्थेबाबत तसेच गावातील समस्यांबाबत सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थांशी चर्चा करत आढावा घेतला.तसेच भात शेतीचा हंगाम सुरु झाला असून शेतकऱ्यांना लागणारी खते व इतर साहित्याच्या पुरवठ्या बाबत त्यांनी माहिती घेतली.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पडते, जी. प. सदस्य राजू कविटकर, अमरसेन सावंत, पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, पं.स. सदस्य राजन जाधव, पं.स.सदस्या श्रेया परब, मथुरा राऊळ, शरयू घाडी, अतुल बंगे, रामभाऊ धुरी, बबन बोभाटे, गंगाराम सडवेलकर, हळदीचे नेरूर सरपंच सागर म्हाडगूत, प्रशांत म्हाडगूत, शिवापूर सरपंच यशवंत कदम, सुधीर राऊळ,वसोली ग्रा पं सदस्या मनीषा परब , अजित परब, केरवडे क. नारूर सरपंच तूषार परब,गोठोस सरपंच सानिका डिगे, वाडोस ग्रा. प. सदस्य कृष्णा धुरी, माणगाव येथील सिद्धेश धुरी, रामा धुरी, बंडू कुडतरकर, साळगाव सरपंच उमेश धुरी,उपसरपंच अमित दळवी, हंसराज सावंत,हुमरस सरपंच अनुप नाईक,आकेरी सरपंच प्राजक्ता मेस्त्री, महेश जामदार, झाराप सरपंच स्वाती तेंडोलकर,अश्फाक कुडाळकर,बाबू गोडे, राजेंद्र तेंडोलकर, बिबवणे सरपंच सायली मांजरेकर, सोनी बिबवणेकर, पिंगुळी उपसरपंच सागर रणसिंग,पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, आदींसह
ग्रामसेवक,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,तलाठी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
