Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार सरोवराचे पाणी झाले गुलाबी

Responsive Ad Here
शेख  सज्जाद शेख करामत@ प्रतिनिधी मेहकर तालुका

बुलडाणा, 10 जून  आज जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे पाणी अचानक गुलाबी झाले. लोणार मधील हजारो नागरिकांनी सरोवराचे हे गुलाबी रुप पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. हिरवे आणि निळे दिसणारे सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर याबाबत अनेकांच्या मनात कुतुहुलसुद्धा निर्माण झाले. दरम्यान तहसीलदार सैदन नदाफ यांनी सरोवराला भेट देऊन पाहणी केली. पाण्याने रंग कशामुळे बदलला, याचे संशोधन सुरू आहे. आधी कोरोना, मग टोळधाड, नंतर चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांच्या मालिकेत सरोवराचे गुलाबी पाणी आणखी कुठल्या संकटाचे संकेत देत आहे का ? या दिशेनेही काही जिज्ञासूंनी विचार करायला सुरुवात केली आहे.


अशातच होणार लोणार सरोवराचे पाणी खारट असल्याने हॉलो बॅक्टेरिया आणि एक पेशी वनस्पती दोन आलिया सालींची उपस्थितीमुळे केरोटीन नाईट नावाचा रंगद्रव्य गुलाबी रंग असू शकतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे त्यामुळे या अगोदर मागील वर्षी पहिल्या पावसात सरोवराचा पाण्यात रंग पिवळसर होता तर यावर्षी मात्र सहभागी झाल्याने नेहमी निळसर हिरवा असणारा रंग दरवर्षी बदलत असल्याने यावर संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे नाहीतर सर्वांचा निसर्गरम्य देखावा लोप पावत जाईल पण संवर्धन व संवर्धन होणे गरजेचे झाले आहे