किरण वाघ@ प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा
मलकापूर शहरातील वाढता कोरोना संसर्ग व त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, भीम नगर येथे स्वतंत्र ॲम्बुलन्स व एक्स-रे मशीन उपलब्ध करून देण्यात आली होती. आता भिमनगर कोरोना मुक्त झाल्यामुळे या ॲम्बुलन्स व एक्स-रे मशीनची आवश्यकता राहिली नसल्याने ही संसाधने इतरत्र गरजू वस्तीमध्ये स्थलांतरित करण्याबाबत विनंती अशांतभाई वानखेडे यांनी केली.
शहरातील वाढता कोरोना संसर्ग , मृत्यूच्या संख्येत होत असलेली वाढ ,सुरुवातीला शहरातील भीम नगर परिसरात कोरूना बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढून भयावह स्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत प्रशासनाने अथक प्रयत्न कामी आले. कोरोना बाधितांची साखळी तीन वेळा तोडण्यात महसूल आरोग्य व पोलीस यंत्रणा, स्थानिक संयुक्त प्रयत्नातून व सहकार्याने यश प्राप्त करता आले. भिम नगर बाबत स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणा आणि नगरपरिषद संवेदनशील बनवल्याने सदर साखळी तोडण्याचा यश मिळवता आले. जिल्हास्तरावरून पालकमंत्री डॉ. शिंगणे मा. जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी भीम नगर येथील परिस्थितीची दखल घेत एक स्वतंत्र ॲम्बुलन्स व अद्ययावत एक्स-रे मशीन उपलब्ध करून दिली होती. सदर मशीन प्रेमराज फिटनेस क्लब च्या प्रशस्त इमारतीत लावण्यासाठी मा. जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडित मा. उपविभागीय अधिकारी विंचनकर तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे नायब तहसीलदार दराडे मुख्य अधिकारी रमेश ढगे व आरोग्य विभागाची चमू आदींनी भीमनगर ला भेट दिली याबद्दल प्रभागाचे नगरसेवक तथा समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांतभाई वानखेडे यांनी यंत्रणेचे आभार मानले असून भीम नगर आता कोरोना मुक्त झाले असल्याने या स्वतंत्र अंबुलन्स आणि एक्स-रे मशीन ची आवश्यकता नसल्याचे सांगत ही संसाधने इतर गरजू वस्तीमध्ये स्थलांतरित करण्याबाबत विनंती अशांतभाई वानखेडे यांनी केली अशी माहिती दिलीप इंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली .


