Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सोलापूर जिल्ह्यात आज मंद्रूप पोलीस लाईन दक्षिण सोलापूर, नवीन विडी घरकुल दक्षिण सोलापूर, कवठा तांडा तालुका उत्तर सोलापूर येथे प्रत्येकी एक पुरुष पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला.

Responsive Ad Here
    सोलापूर महापालिका कार्यक्षेत्र आणि जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्र असं कोरोना आकडेवारी बाबत प्रशासनाने विलगीकरण केलं आहे.

 दोघांकडूनही वेगवेगळ्या वेळेस आकडेवारी उपलब्ध होत आहे.

सोलापूर महापालिकेनं शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंतचा कोरोना रिपोर्ट सकाळी 8 वाजता प्रसिद्ध केला आहे.त्यानुसार आतापर्यंत 1107 पॉझिटिव्ह तर मृतांची संख्या 94 इतकी दिली आहे.

जिल्हा  आरोग्य अधिकाऱ्यांनी आज  शनिवार दिनांक 6 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतची  आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सोलापूर ग्रामीण मध्ये आतापर्यंत 73 पॉझिटिव्ह तर मृतांची संख्या 6 इतकी झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

सोलापूर जिल्ह्यात आज मंद्रूप पोलीस लाईन दक्षिण सोलापूर, नवीन विडी घरकुल दक्षिण सोलापूर, कवठा तांडा तालुका उत्तर सोलापूर येथे प्रत्येकी एक पुरुष पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला.

     जिल्ह्यातील करमाळा आणि मंगळवेढा तालुका वगळता बहुतेक सर्व तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.

 शहर आणि ग्रामीण अशी दोन्ही मिळून सोलापुर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह 1180 तर मृतांची संख्या 100 झाली आहे. 

🌨️☀️🌞🌨️☀️🌞
 सांज 
 सोलापूरचे आजचे तापमान 
   
  06-06-2020  
  कमाल तपमान  
  36.8     98.2  
  किमान तपमान  
  24.5     76.1   
  आर्द्र्ता 48%  
  पाऊस सकाऴी 
0830 ते 1730 
पर्यत    0.6 मि. मी .

सोलापूर जिल्ह्यात आज सायंकाळी अनेक तालुक्यात ढगाळ हवामान आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी  पावसाच्या सरी कोसळल्यात. पंढरपूर आणि परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे.