Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मेहकर जवळ असलेल्या मोळा गावामध्ये बिबट्याचा हैदोस

Responsive Ad Here

 नयन खरात @ प्रतिनिधी मेहकर

आज दि   सायं ५:३० वाजता मेहकर तालुक्यामधील मोळा येथे  गावालगत असलेल्या नाल्यांमध्ये गावातील काही लोकांना बिबट्या दिसला बिबट्या  दिसतात उपस्थित शेतक-यांनी  कल्लोळ केल्याने, गावातील जनसमूह बिबट्यांना बघण्यासाठी जमा झाला असता सदर बिबट्याने समूहा मधील तीन ते चार व्यक्तीच्या अंगावर चाल करून,त्यांना गंभीर जखमी केले.जखमी व्यक्तींना उपचारासाठी मेहकर येथे आनण्यात आले आहे


सदर हिंसक वन्यप्राणी गावांमध्ये शिरण्याचे कारण काय? वनविभागाच्या दुर्लक्ष पणामुळे सर्व सदर वन्यप्राण्यांना पाणी मिळत नसल्याने वन्य प्राणी गावानजीक असलेल्या पाण्याच्या क्षेत्राकडे वळताना दिसत असल्याचे जनता बोलत आहे. बिबट्याच्या या गावांमधील प्रवेशाने मोळा येथील जनता व परिसरातील जनता  मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहे . मोळा येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याची माहिती वन विभागाला कळविले असता वन अधिकाऱ्यांनी सदर भ्रमणध्वनी उचलला नसल्याने वनविभाग व कार्यक्षम असल्याचे दिसत आहे.