Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तिघरा येथील झोपडपट्टी वासीयांना केव्हा मिळणार वीज ग्रामपंचायत, म.रा.वि.वि.कंपनी ची टोलवाटोलवी ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा

Responsive Ad Here
 नंदकिशोर इंगळे@ प्रतिनिधी पापळ

        ग्रामपंचायत वाढोणा (रामनाथ) अतंर्गत येत असलेल्या मौजा तिघरा वीस वर्षेपूर्वी निर्माण झोपडपट्टी वस्तीत कायमस्वरूपी वीज पुरवठा व्यवस्था करण्यात आली नसून यावस्तीतील नागरिकांना गंभीर समस्यानां सामोरे जावे लागत आहे.येथील वस्तीत कसेबसे तीन चार पोल टाकून साधा केबल टाकून त्यावरून वीज पुरवठा व चार पथदिवे लावण्यात आले आहे. ५०घराच्या वस्तीत चार खांब असल्याने अनेक घरावर केबलचे जाळे निर्माण झाले आहे. हवा आली की येथील वीज पुरवठा खंडित होतो.लांबलचक केबल असल्याने ते सुध्दा वेळोवेळी तुटतात परिणामी नागरिकांना अंधारात राहावे लागते.याबाबत अनेकदा संबंधित ग्रामपंचायत कडे लेखी तक्रारी ग्रामसभेत गंभीर मुद्दा यावर दखल घेण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.विचारणा केली तर तुमच्या वस्ती चा प्रस्ताव पाठविला आहे. तुम्ही म.रा.वि.वि.कंपनी कडे जा.एवढेच उत्तर ऐकायला मिळते. तिथे गेलो तर तुम्ही ग्रामपंचायत ला विचारा या टोलवाटोलवी मध्ये येथील नागरिकांचे वीस वर्षे लोटली

मौजा तिघरा येथील झोपडपट्टी मधिल वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने येथील विद्यार्थ्यांना आपला अभ्यास दिव्याच्या प्रकाशात करावा लागतो. राबराब राबनार्या नागरिकांना सुखाची झोप घेता येत नाही आम्ही माणसे नाही का? कसा संतप्त सवाल व्यक्त केला आम्हाला जनावरांप्रमाणे दिवस काढावे लागतात. आमचा वनवास कधी संपणार, केव्हा मिळणार सुरळीत वीज पुरवठाअसे अनेक सवाल येथील महिला व नागरिकांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. 
      आमच्या वस्तीतील विद्युत समस्या निकाली काढावी पूर्ण वस्ती तविद्युत पोल खांब, टाकावे, विद्युत तार बसविण्यात यावे त्या वर पथदिवे बसविण्यात यावे या मागण्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा आमरण उपोषण सुरु करु असा इशारा पुंडलीकराव ऊईके, हरिदास शिंदे, संदीप चव्हाण, प्रविण पुराम,किसनराव ऊईके,संतोष वरखडे, त्रिवेणी बाई बेंडे,प्रकाश ऊईके,निरंजन इंगोले, शांताबाई ऊईके,आशाबाई चव्हाण, राईबाई मडावी, सुनिता ऊईके,मंगंला ऊईके आदी नागरिकांनी दिला आहे.