Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अखेर सूनगावच्या शेतकर्‍यांच्या लढ्याला यश, गावात बँकेने सुरू केला पीक कर्ज शिबीर

Responsive Ad Here

शिवदास सोनोने@ प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा

 सूनगाव येथील शेतकर्‍यांनी केलेल्या उपोषणाला अखेर यश आले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने सूनगावमध्ये पीक कर्ज शिबिर आज, 13 जूनपासून सुरू केले असून, पुढील आठ दिवस शेतकर्‍यांना याचा लाभ घेता येणार आहे.
खरीप पेरणीसाठी शेतकर्‍यांना जूनमध्ये पीक कर्जाची आवश्यकता असते. परंतु जामोद येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने सूनगावमधील शेतकर्‍यांना ऑगस्ट महिन्यातील 


तारीख दिल्याने शेतकर्‍यांनी संतप्त होऊन 8 जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्याची दखल उपविभागीय अधिकारी, आमदार डॉ. संजय कुटे, बँक व्यवस्थापनाने घेतली. त्यानंतर यावर कार्यवाही करत आजपासून सूनगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात कर्ज प्रकरणांचे शिबिर घेण्यात येणार आहे. पुढील आठ दिवस हे शिबिर चालू राहील. उपोषण यशस्वी होण्यासाठी पंचायत समिती उपाध्यक्ष महादेवराव धुर्डे, माजी पंचायत समिती सदस्य अशोकभाऊ काळपांडे, कृषिमित्र मोहनसिह राजपूत यांनी परिश्रम घेतले.