किरण वाघ @जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
जिल्ह्यात विविध भागात बुधवारी दिवसभरापासून ढगाळ वातावरण होते. सकाळी कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे . दरम्यान काही ठिकाणी तर ऊन पडले होते. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या निसर्ग वादळाची दिशा संध्याकाळी अचानक बदलल्यामुळे मुंबई वरील संकट टळले. असले तरी उत्तर महाराष्ट्र विदर्भात काही भागात याचा धोका वाढला असल्यामुळे हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे संध्याकाळी जिल्ह्यात विशेषता घाटाखालील पावसाने चांगलाच जोर धरला संकटामुळे आदिती मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांचा मूळ आता निसर्ग वादळाची नवे आव्हान उभे राहिलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा घरात बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात विदर्भात अन्यायापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने सुरुवात झाली रात्री उशिरापर्यंत जळगाव जामोद संग्रामपूर नांदुरा परिसरात चांगलेच पावसाचे पाणी झाले आहे. घाटावर बुलढाणा येथे थोडा पाऊस तुरळक पाऊस झाला. सिदखेडराजा महेकर चिखली येथे पावसाने हजेरी लावली होती. याप्रसंगी वीज पडल्याची किंवा कुठेही नुकसान झाल्याची प्रशासकीय स्तरावर नोंद झालेली नव्हती.