शेख. सज्जाद शेख.करामत@ लोणार तालुका प्रतनिधी
आज लोणार येथे मारोती मंदिर परिसरात लोणार नगर परिषदेचे कडून वृक्षारोपणकरण्यात आले. सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे. तर दुसरीकडे उरण परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे.
तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबविण्यात आले मात्र त्याचा परिणाम झाला नाही. अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसांतच ही वृक्ष नष्ट होत होती वा त्यांची वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करूनही फायदा होत नव्हता.यात सरकारने आता वृक्ष लागवड करून त्याची निगा राखण्याची जबाबदारीही निश्चित केली आहे. त्यामुळे वृक्षांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
पर्यावरण दिना निमित्ताने लोणार नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे साहेब, व आरोग्य निरीक्षक बोरे साहेब, पाणीपुरवठा अभियंता पवार साहेब, नगरसेवक आबेद खान यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी गजानन जाधव सर, दिनकर जाधव, विठ्ठल जाधव, गजानन मोरे व इतर नागरिक उपस्थित होते. सदर उपक्रमाचे केदारे साहेबांनी कौतुक केले.


