प्रमोद देशमुख नादगाव
आपण मुलीला लक्ष्मी म्हणून पूजतो पण लग्न झाल्यावर बाळाचा जन्म जर मुलीच्या स्वरुपात होत असेल तर हन त्या बाळाला नाकारणे कितपत योग्य आहे. माहूर मधील एका दाम्पत्या मुलीला जन्म दिला त्यानंतर मुलीला नाकारत त्या राक्षस पित्याने व घरातील सदस्यांने त्या 1 दिवसाच्या मुलीला घराच्या बाजूला जिवंत गाडले ,अर्ध्या तासाने गावकऱ्यांच्या मदतीने त्या मुलीला काढले. सुदैवाने मुलीचा जीव वाचला ते म्हणतात न देव तारी त्याला कोण मारी.असा हा विषय आहे. काय 'पाप त्या मुलीचं जिने आणखी जग सुद्धा बघितले नाही.आणि गद्यात पुरले.अश्या (माय: बापाला) फाशी देण्यात यावी. अशी गावकऱ्यात चर्चा रंगली.मुलगा आहे की मुलगी हे सुद्धा चेक करणे कायद्याने गुन्हाआहे.अनेक माता पिता हा कायदा मोडतात.त्यावर कुणाचेच लक्षच
नाही.अशीही चर्चा गावकऱ्यात रंगली.मोडा पण त्यासाठी बाळ मुलगी असेल तर तिचा जीव का घ्यायचा ति जन्म देणारी आई ची आई मुलगी च होती न पित्याला जन्म देणारी आई पण मुलगीच आहे न मग का अस करता मुलगाच असे काय करतो PUBG खेळायला मुलगा पाहिजेत का तुम्हाला मुलगी पण खेळू शकते.
भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील होऊन गेल्या.त्या पण कधीतरी मुलगीच होत्या.देशाच्या वित्त्मंत्री पण पाहा.असे किती तरी उदा..आहे मुलीला एवढे कमी लेखू नका लक्षात असू द्या.
