शिवदास सोनोने
व्हिओ बुलढाणा जिल्ह्य़ातील संग्रामपुर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन येथे कार्यरत महिला पोलीस कर्मचारीने सोनाळा पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध अश्लील चाळे करण्या संदर्भात तक्रार दिली होती परंतु सदर पोलीस कर्मचाऱ्यांवर आज पर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
अश्या ह्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारीची प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा दि 15 अगस्ट स्वतंत्रदिनी सकाळी 9 वाजता लोकशाही पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर आत्मदहन करण्याचा इशारा अॅड प्रमोद घाटे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

