चोपडा ..महाराष्ट्रत प्रामुख्याने दूध उत्पादन शेतकरी शेतमजूर अल्पभूधारक आहेत.लॉकडाऊन मुळे आधीच प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असतांना दूध 10 रु उत्पादन खर्च पेक्षा कमी दराने विकावे लागत आहे. तरी केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. या विरोधात दूध उत्पादन शेतकऱ्यांनी एकजुट दाखवून 21 जुलै रोजी राज्य भर निषेध व्यक्त करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य किसान सभा जळगाव जिल्हा किसान सभा करीत आहे. खालील प्रमाणे मागण्या त्वरीत शासनाने मंजूर कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किसान सभा देत आहे
मागण्या
1)केंद्र सरकारने 23 जून रोजी10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करावा दूध पावडर आयात करणे म्हणजे दुधाला रास्त भाव नाकारण्याचे कारस्थान होय
2)30हजार टन बफर दूध स्टाक करा.तसेच प्रति लिटर निर्यात अनुदान 30रु देण्यात यावे.
3)दूध पावडर, बटर,तूप,इतर दुग्धजन्य पदार्थवरील जीएसटी रद्द करावा
4)पुढील3 महिन्यासाठी प्रति लिटर 5 रु अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे
सदर आंदोलन शांततेच्या मार्गाने . दूध संकलन न करता गोर गरीब ना वाटून करावे. दुधाची नासाडी करू नये.
राज्य भर शेतकरी संघटनेचे व दुध उत्पादक शेतकऱयांनी पुकारले ले आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड नामदेव गावडे, राज्य अद्यक्ष कॉम्रेड मधुकर पाटील, , कॉम्रेड राजू देसले जळगाव जिल्हाध्यक्ष,विठ्ठल बडगुजर सचिव ज्ञानेश्वर पाटील,धोंडू पाटील छोटू पाटील मनोहर चौधरी शिवाजी पाटील चंदू माळी, जिल्हा सुकानु समिती निमंत्रक अमृत महाजन, आदींनी केले आहे