Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

औरंगाबादमध्ये लॉकडाऊन काळात 'अँटिजन टेस्ट', 30 मिनिटांत रिपोर्ट

Responsive Ad Here

दत्ता जाधव @ प्रतिनिधी औरंगाबाद

औरंगाबाद : कोरोनाबाधित रूग्णांची जलदगतीने माहिती मिळावी यासाठी आता ‘अँटिजन टेस्ट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 ते 18 जुलै दरम्यान पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या परिसरातील नागरिकांची या पद्धतीद्वारे चाचणी घेण्यात येईल. याशिवाय शहरात येणाऱ्यांनाही ही चाचणी करूनच प्रवेश देण्यात येणार आहे.दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे़ रूग्ण आढळल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे संस्थात्मक विलगीकरण करून लाळेचे नमुने (स्वॅब) घेण्यात येतात. नमुने घेतल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत 24 तासांपेक्षा अधिक कालावधी 


लागतो. तोपर्यंत रूग्णांवर उपचार करण्यास विलंब होतो. यावर पर्याय म्हणून ‘अँटिजन टेस्ट'चा पर्याय समोर आला आहे. त्याचाच वापर करून कोरोनाबाधितांना शोधण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. 10 ते 18 जुलै दरम्यान होणाऱ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ‘अँटिजन टेस्ट करण्यात येणार असून यासाठी 17 टास्क फोर्स सज्ज करण्यात आले आहे. शहरात जिथे जिथे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येईल, तेथील 500 मीटरच्या अंतरावरील नागरीकांची ‘अँटिजन टेस्ट’ करण्यात येईल. अवघ्या अर्धा ते एक तासामध्ये टेस्टचा रिपोर्ट प्राप्त होणार असल्याने बाधित रूग्णांवर वेळीच उपचार होणार आहे.