खुलताबाद प्रतिनिधी
कोणत्याही आजार टाळण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ति उत्तम उसणे खुप गरजेचे असते. मात्र कोरोनावर अद्याप ही लस उपलब्ध न झाल्याने सुरक्षतेच्या दृष्टकोनाने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार रोग प्रतिकारशक्ति वाढविण्या करिता आर्सेनिक गोळ्यांचे वाटप खुलताबाद तालुक्यात ही सुरु आहे. या प्रसंगी आज आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांची बाजार सावंगीत वाटप करण्यात आले.कोरोना विषाणुच्या पार्शवभूमीवर रोग प्रतिकारशक्ति वाढण्यासाठी आमदार
सतिश चव्हाण (म. प. म. ) व फोस्टर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अयुष मंत्रालय विभाग कोविड -19 . रोगप्रतिबंधक होमिओपॅथीक"आर्सेनिक अल्बम-30" औषधांचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी गावातील सर्वसामान्य व पदवीधर नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच भिमराव नलावडे, जेष्ठ समाजसेवक पुंजाजी आण्णा, माजी ग्रा. पं. सदस्य चांद पठाण, म.गां.तं.मु.स.अ. प्रकाश पा नलावडे, मा. रा. काँ. ता.अ. भगवान कामठे, ग्रा.पं सदस्य अप्पाराव पा नलावडे, जेष्ठ नागरिक गायकवाड काका, डॉ. आशोक खरे, जितु शेठ निकम, गुलाब नाके, रमेश नलावडे, कचरू नलावडे, रईस शाह, निलेश नलावडे, रामदास आहेवाड, वैभव काटकर सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

