खुलताबाद प्रतिनिधी
खुलताबाद शहरसह तालुक्यातील बाजारसावंगी, गदाना, टाकळी, सुलतानपुर येथे व परिसरात समाधानकारक पाऊस व लागवड पेरा नंतर खतासाठी शेतकऱ्यांची चढावढ सुरु असल्याचे चित्र आहे. खुलताबाद तालुक्यात तथा बाजार सावंगी परिसरात मंडळमध्ये वळेवर लगवड - पेरा तद्नंतर समाधानकारक पाऊस झाला व सुरू असल्याने खते खरेदी व टाकण्यासाठी शेतकऱ्यांत चढावढ सुरू आहे. अवकाळी, रोहीण्या, मृगनक्षत्राच्या पावसा दरम्यान वेळेवरच मंडळ मधे लागवड व पेरा झाल्याने व यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने व होत असल्याने शेतकरी अतिशय आनंदी असुण
![]() |
| File photo |
खरिप पिके जबरदस्त टवटवीत हिरवीगार झाली असुण जोमदार वाढ सुरु आहे. मंडळ मधे पाऊस उघडीप देत नसल्याने खरिप पिक अंतर्गत मशागतीला व्यत्यय येत आहे. मध्यंतरी एका दोन दिवस पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांनी अंतरमशागत केली आहे. पिकात जबरदस्त वाढ होत असल्याने निंदनी- खुरपणी, वखर मारणे, कोळपणी करणे, खते टाकणे, औषधी फवारणी करणे कामे समोर आली आहे. पाऊस उघडताच शेतकरी पिक अंतरमशागत व खते टाकणे औषधी फवारणी कामे करताना दिसत आहे. बाजारपेठ मध्ये रासायनिक खते खरेदीला शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.
