राजू कलाने प्रतिनिधी अमरावती
अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी
नवाथे चौक, अशोक नगर या परिसराची पाहणी आज केली. महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यावेळी उपस्थित होते.
या परिसरातील काही भाग महानगरपालिकेच्या वतीने सिल करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांना आता अति दक्षता घेणे गरजेचे आहे. या परिसरातील नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यावेळी केले. हाआजाराची साखळी तोडणे फार महत्वाचे आहे त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करुन प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करावे असेही यावेळी त्यांनी सांगितले.आयसोलेशन आरोग्य केंद्राच्या सार्वजनीक आरोग्य परिचारीका यांनी यावेळी सांगितले की नवाथे चौक येथिल प्रतिबंधित क्षेत्रातील घरांना भेटी देण्यात
आल्या असून लोकांची माहिती घेण्यात आली. सदर परिसरात महानगरपालिकेची टिम कार्यरत आहे. या परिसरातील हायरिस्क लोकांची यादी तयार करण्यात आली असून यादीनुसार त्यांचा पाठपुरावा घेतला जातो. काही लक्षणे आढळल्यास त्यांना स्वॅप घेण्यासाठी संदर्भीत करतो. प्रतिबंधीत क्षेत्रातून लोकांनी बाहेर जावू नये यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी त्यांच्या कामाची यावेळी प्रशंसा केली व त्यांना स्वतःहाची काळजी घेण्याच्या सुचना दिल्या. अधिकारी, कर्मचारी मेहनत घेत असून सर्वानी स्वतःची काळजी घेवूनच कार्य करण्याचे सुचना दिल्या. या पिरसरातील रुग्नांची संपुर्ण माहिती यावेळी त्यांनी घेतली त्यांना कश्याप्रकारे लागन झाली यांची माहिती घेतनागरिकांनी शक्यतोवर गर्दीच्या ठिकाणी जावू नये अश्या सुचना दिल्या तसेच महानगरपालिकेला सुचित केले की, जे कुणी परवानगी न घेता कार्यक्रम करत असेल त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी.विलास नगर येथील महानगरपालिकेच्या 17 नंबर च्या
शाळेची पाहणी जिल्हाधिकारी महोदय यांनी आज केली. या ठिकाणी कोव्हीड 19 चाचणीकरिता रॅपीड अॅन्टीजन टेस्ट सेंटर सुर करण्यात येणार आहे. सेंटरला आवश्यक असणा-या सर्व बाबी या ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. या सेंटरवर येणा-या लक्षणे बाधीत व्यक्तींना योग्य अशी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे असेही यावेळी त्यांनी सांगितले.अशोक नगर परिसरात रुग्नांची संख्या वाढत असल्यामुळे सदर परिसरातील नागरिकांनी अतिदक्षता घेणे गरजेचे आहे. यासाठी सदर परिसराती कडक निर्बध्द लावण्याच्या सुचना यावेळी जिल्हाधिकारी व मनपाआयुक्तांनी यंत्रणेला दिल्या. या परिसरात बाहेरुन नागरिकांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला असून तो काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. येथील नागरिकांच्या समस्या यावेळी त्यांनी जाणून घेतल्या व यंत्रनेला त्वरीत कार्यवाही करण्याचे निेर्देश यावेळी दिले. येथील नागरिकांनाही त्यांनी स्पष्ट सुचना दिल्या की आरोग्य यंत्रणा ज्या सुचना देत असेल तयांचे तंतोतंत पालन करावे.ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास असल्यास, वृध्द व दिव्यांग व्यक्तींना काही त्रास असल्यास, कोणतेही व्यक्ती कोव्हीड- 19 च्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती शहरी आरोग्य केंद्रांवरील वैद्यकिय अधिका-यांनी द्यावी व नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देत सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला. परिसरातील नागरीकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, अशी सूचना केली.यावेळी सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, विशाखा मोटघरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे,शिक्षणाधिकारी डॉ. अब्दुल राजीक, डॉ. देवेन्द्र गुल्हाने, उपअभियंता श्री तायडे, डॉ. संदिप पाटबागे, मुख्यध्यापक बंडु भुयार, अभियंता दिेनेश हंबर्डे, विवेक देशमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


