शिवदास सोनोने
सुनगाव तालुका जळगाव जामोद येथील वार्ड नंबर 3 मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगराई पसरण्याची शक्यता असून सदर ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे सदर वार्ड नंबर 3 मधील गल्लीमध्ये पूर्ण नाल्या ब्लॉक केले असून त्यामुळे जागोजागी पाण्याचे डबके साचले असून सदर पावसाच्या दिवसांमध्ये टायफाईड कॉलरा मलेरिया यासारखे आजार पसरण्याची दाट शक्यता असून कोरोना सारख्या महामारी मध्ये सुध्दा याकडे ग्रामपंचायत साफ दुर्लक्ष करीत आहे तरी ग्रामपंचायत ने याकडे लक्ष देऊन सदर साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून नाल्या ओपन करावि एकीकडे कोरणा चे संकट तर दुसरी कडे असलेल्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या रोगराई कडे ग्रामपंचायत प्रशासन साफ दुर्लक्ष करत आहे तरी सदर नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता ग्रामपंचायतीने सदर बाबीकडे लक्ष देऊन सांडपाण्याची तसेच नाल्याची व्यवस्था करावी अशी वार्ड नंबर 3 मधील नागरिकांची मागणी जोर धरत आहेत.

